Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

दुर्योधन, दुःशासनाच्या नशिबी आलं तेच त्यांच्या नशिबी येईल - योगी आदित्यनाथ

Duryodhana
, गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (13:39 IST)
उत्तर प्रदेशात महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या व्यक्तींची स्थिती महाभारतातील दुर्योधन, दुःशासनाच्या यांच्याप्रमाणे होईल , असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.
 
संबलमध्ये योगी आदित्यनाथांच्या हस्ते 62 योजनांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी योगी आदित्यनाथ बोलत होते.
 
आधी आपल्या बहिणींना, मुलींना शाळेतही जाता येत नव्हतं. तेव्हा गुंडगिरी करणारे या महिलांच्या प्रतिष्ठेसोबत खेळायचे. आज अशी हिंमत केली तर त्यांना धडा शिकवण्यात येईल.
 
दुर्योधन, दुःशासनाच्या यांच्या नशिबी आलं तेच त्यांच्या नशिबी येईल असं योगींनी म्हटलं.
 
दरम्यान, समाजवादी पक्ष हा महिला विरोधी, दलितविरोधी आणि मागास वर्गाविरोधी असण्याबरोबरच हिंदूविरोधी तसेच लहान मुलांच्या अधिकारांविरोधात असणारा पक्ष आहे, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत अमेरिकेकडून 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार, मोदींची ड्रोन निर्माता कंपनीच्या CEOसोबत बैठक