Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये बनणार ई-पासपोर्ट

नाशिकमध्ये बनणार ई-पासपोर्ट
, गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (08:33 IST)
नाशिकमधील नोटप्रेस आणि प्रतिभूती मृद्रणालय याठिकाणी सरकारी दस्तऐवज आणि नोटांची छपाई केली जाते. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय  प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह शहरातील ई-पासपोर्टसाठी  इंडियन सिक्युरिटी प्रेस  आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरसोबत काम करत आहे...
 
नोटबंदी  काळात सर्वाधिक नोटा नाशिकच्या नोटप्रेसमध्येच छपाई होऊन पाठविण्यात आल्या होत्या. यावेळी नाशिकच्या नोटप्रेस कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून नोटांची छपाई करत दिलासा दिला होता. परराष्ट्र मंत्रालयाकडून ई-पासपोर्टसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. ई-पासपोर्टसाठी लागणारी चीप नाशिकरोड प्रेसला उपलब्ध करण्यासाठीदेखील वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे समजते.
 
परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्टबाबत नाशिकरोडच्या प्रेस प्रशासनासोबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे. सरकार दरवर्षी सरासरी एक कोटी पासपोर्ट देत असते. प्रगत देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असलेले ई-पासपोर्ट उपलब्ध केले जातात. भारतात मात्र, अजून छोट्या डायरीच्या स्वरुपात पासपोर्ट दिला जातो.
 
पासपोर्टची छपाई देशात फक्त नाशिकरोडच्या प्रेसमध्येच होते. हा पासपोर्ट बंद करून इलेक्ट्रॉनिक चीप असलेला ई-पासपोर्ट जारी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. केंद्रीय अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग व प्रेस महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पात्रा घोष यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला भेट दिली होती. तेव्हापासून ई-पासपोर्टबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परमबीर सिंग आणि ईडीच्या माध्यमातून ठाकरेंना बदनाम करण्याचे षडयंत्र : उदय सामंत