राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा 11.36 वाजता भूकंप आला. मिळालेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू बिकानेरपासून 685 किमी पश्चिमेला आणि 10 किमी खोलीवर होता. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही.
याआधी 26 मार्च रोजी बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.2 होती. पहाटे 2.16 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्याचा केंद्रबिंदू बिकानेरपासून 516 किमी पश्चिमेला होता.