जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.0 इतकी मोजली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा होती. दुपारी2.52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची खोली 216 किमी होती. यापूर्वी 14 जून रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 मोजली गेली. दुपारी 1.05 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू ताजिकिस्तानच्या सीमावर्ती भागात होता.