Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाबा सिद्दिकी यांची ४६२ कोटीची मालमत्ता जप्त

बाबा सिद्दिकी यांची ४६२ कोटीची मालमत्ता जप्त
काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीने  पीएमएलए कायद्यातंर्गत वांद्रे पश्चिमेला असलेली ४६२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही सर्व मालमत्ता तीनवेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दिकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्स या रिअल इस्टेट कंपनीची आहे. वांद्रे रेक्लेमशन येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घोटाळया प्रकरणी ईडीने बाबा सिद्दिकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्स विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
पिरॅमिड डेव्हपर्सने एसआरए अंतर्गत विकास करताना अनियमितता केल्याचा आरोप आहे. प्रकल्प विकसित करताना पिरॅमिड डेव्हपर्सने सॅट्रा ग्रुपला भूखंड विकला त्यानंतर दोघांनी संयुक्त विकास करार केला. त्यामध्ये समसमान फ्लॅटस वाटून घेण्याचे ठरले होते. बाबा सिद्दिकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्सने या आलिशान फ्लॅटसच्या विक्रीमधून १८०० ते २००० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवल्याचा ईडीला संशय आहे. सिद्दीकी २००० ते २००४ दरम्यान म्हाडाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान खानला जामीन मंजूर…