Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

‘कार्टुन’ दाखविण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

Eight year old girl
, सोमवार, 9 डिसेंबर 2019 (15:40 IST)
हैदराबाद, उन्नाव येथील नृशंस घटनांनी देशभर गदारोळ उठलेला असतनाच अंबडमधील महालक्ष्मीनगरमध्ये आठ वर्षीय बलिकेवर ‘कार्टुन’ दाखविण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग केल्याचा संतापजनक प्रकार रविवारी (दि.८) दुपारी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी संशियत नराधमाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महालक्ष्मीनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह, भाडेतत्वावर घर घेऊन राहायला आले होते. याठिकाणी पुर्वीपासून राहत असलेल्या कैलास रामू कोकणी (२३) याने कुटुंबातील एका आठ वर्षाच्या बालिकेला ‘कार्टुन’ दाखविण्याच्या बहाण्याने शेजारील घरमालकाच्या घरावरील छतावर नेले. तेथून नराधम कोकणी हा बालिकेला स्वत:च्या राहत्या खोलीत घेऊन गेला. घरात अन्य कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत बालिकेवर बळजबरीने अत्याचार केला. काही वेळातच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्याचवेळी जवळच राहणाऱ्या कोकणीला याबाबत विचारणा करण्यासाठी पिडित बालिकेच्या आईने हाक मारली असता संशयित कोकणी याने घाबरून बराचवेळ दरवाजा उघडला नाही. यावेळी शेजाऱ्यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले . भेदरलेल्या मुलीने तत्काळ आईला मिठी मारत घडलेला प्रकार रडत रडत कथन केला.
 
या घटनेची वाच्यता होताच जमलेल्या परिसरातील रहिवाशांनी संशयित कोकणी यास चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संशयित कोकणी यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत कोकणीविरूध्द बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे