Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणुकीत उमेदवारांनी करावयाच्या खर्चाची मर्यादा वाढली

निवडणुकीत उमेदवारांनी करावयाच्या खर्चाची मर्यादा वाढली
निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांनी करायच्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अ वर्गातील महापालिकांसाठी ( सदस्य संख्या 151-175 असलेल्या पालिका ) उमेदवारांना पाच लाखांपर्यंतच्या खर्चाची मुभा होती. ती वाढवून आता दहा लाख करण्यात आली आहे.
 
ज्या महापालिकेतील सदस्य संख्या 116-150 आहे, त्यांना 8 लाख रुपये, ज्या महापालिकेतील सदस्य संख्या 86-115 आहे, त्या महापालिकेतील उमेदवारांना 7 लाख, तर 65-85 सदस्य संख्या असलेल्या महापालिका उमेदवाराला 5 लाख रुपये खर्चाची मुभा असेल. जिल्हा परिषदांची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना 6 लाख आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढणाऱ्या उमेदवारांना 4 लाख खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूर महापालिकेसाठी आघाडी नाही