निवडणूक आयोगाने ८ जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे.अद्याप निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीची पुढील तारीख जाहीर केलेली नाही. गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील १० राज्यसभेच्या जागांसाठी जून महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक होणार होती. राज्यसभेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माकपचे सचिव सीताराम येचुरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण नेत्यांचा कार्यकाळ जुलै ते ऑगस्ट दरम्यान संपणार आहे. राज्यसभेच्या दहा खासदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन तर माकपच्या एका सदस्याचा समावेश आहे.