Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या 3 राज्यात पोटनिवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या

या 3 राज्यात पोटनिवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या
, सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (16:39 IST)
सध्या सर्वत्र निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. आता उत्तरप्रदेशातून पोटनिवडणुकीबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. या 3 राज्यात पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये निवडणूक आयोगाने बदल केला आहे. पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार होती आता निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. 

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या नऊ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, केरळ, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका विविध सणांमुळे 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. 

निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे की, 15 नोव्हेंबर हा कार्तिक पौर्णिमा स्नानाचा सण आहे, अशा स्थितीत काँग्रेस, भाजप, बसपा, आरएलडी आणि इतर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांनी मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती. या मागणीवरून आयोगाने मतदानाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर ऐवजी 20 नोव्हेंबरला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले

यूपीमध्ये गाझियाबाद, मीरपूर, कुंडरकी, खैर, करहल, सिस्माऊ, फुलपूर, कटहारी, माझवान या जागांवर मतदान होणार आहे. या नऊ जागांसाठी 20 नोव्हेंबर2024 रोजी मतदान होणार आहे.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर 3 लाख पदांवर भरती करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा