Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबब तीन खोल्यांच्या घराच वीज बील 3800 कोटी

electric bill
, सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (17:18 IST)

झारखंडच्या जमशेदपूर राहणाऱ्या एका कुटुंबाला विद्युत मंडळाने  100-200 कोटी नव्हे तर तब्बल 3800 कोटी रुपयांचं वीज बिल पाठवलं आहे. सदरचे बील बी आर गुहा यांना हे बिल मिळालं आहे. सोबतच महामंडळाने त्यांच्या घराचा वीजपुरवठाही खंडित केला आहे. एवढं वीजबिल पाहून गुहा यांना धक्काच बसला. गुहा म्हणाले, “आमचं तीन खोल्यांचं घर आहे. त्या तीन खोल्यात एक-एक फॅन आणि एक -एक ट्यूबलाईट आहे. घरात एकच टीव्ही आहे. तरीही इतकं बिल आल्याने मला धक्का बसला.”

दुसरीकडे गुहा यांच्या मुलीने वीज महामंडळावर संताप व्यक्त केला आहे. “माझ्या आईला मधुमेह तर वडिलांना रक्तदाबाचा त्रास आहे. इतकं बिल पाहून त्यांना धक्का बसला आहे. आम्ही झारखंड विद्युत बोर्डाकडे तक्रार केली आहे”, असं रत्ना यांनी सांगितलं.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘अॅम्बी व्हॅली’ लिलावाचा मार्ग मोकळा