Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगन्नाथ रथयात्रेतील हत्ती नियंत्रणाबाहेर गेले

elephant in jagannath rathyatra
, शुक्रवार, 27 जून 2025 (17:56 IST)
अहमदाबादमध्ये शुक्रवारी सकाळी भगवान जगन्नाथाची १४८ वी रथयात्रा सुरू झाली, ज्यामध्ये हजारो भाविक भगवानांच्या दर्शनासाठी जमले होते. शतकानुशतके जुन्या परंपरेनुसार शहरातील जमालपूर भागात असलेल्या जगन्नाथ मंदिरातून भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे रथ खलासी समुदायाने बाहेर काढले. तसेच यात्रा सुरू झाल्यानंतर काही वेळातच हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. अशी माहिती समोर आली आहे. 
४०० वर्ष जुन्या मंदिरातून तीन रथांची भव्य मिरवणूक सुरू झाली, त्यादरम्यान १७ हत्तींचा समूह पुढे जात होता. तसेच, एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेला, ज्याला पाहून लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यावर नियंत्रण मिळवले. आता १७ पैकी १४ हत्ती रथयात्रेत सहभागी होणार आहे, तर ३ हत्तींना तात्काळ यात्रेतून काढून टाकण्यात आले. या घटनेनंतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनियंत्रित हत्ती इकडे तिकडे पळू लागला आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनियंत्रित हत्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला बांधून रथयात्रेच्या बाजूला नेण्यात आले.  
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता