कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSEना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी टर्म 1ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकालही लावण्यात आला होता. आता CBSE बोर्डाच्या परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजे सीबीएसई टर्म 2 एक्झाम परीक्षा ही उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जोमानं अभ्यासाला लागले आहेत. त्यात काही विद्यार्ध्यांनी दोन टर्मपैकी टर्म 1 हे परीक्षा दिली नसल्यामुळे असे विद्यार्थी चिंतेत होते. अशा विद्यार्थ्यांना CBSEनं मोठा दिलासा दिला आहे.
जर विद्यार्थ्यांनी टर्म 1 किंवा टर्म 2 पैकी कोणतीही परीक्षा दिली नाही किंवा काही अपरिहार्य कारण्यास्तव देऊ शकले नाहीत,
तरीही अशा विद्यार्थ्यांचा निकाल कॅल्क्युलेट करून जाहीर करण्यात येणार आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाआधी घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये CBSE बोर्डाकडून या संबंधीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टर्म एकची परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.