Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे इव्हीएम नव्हेतच : निवडणूक आयोगाकडून खुलासा

हे इव्हीएम नव्हेतच : निवडणूक आयोगाकडून खुलासा
, बुधवार, 10 मे 2017 (10:32 IST)

निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे आमदार सौरव भारद्वाज यांनी दाखवलेले मशीन हे इव्हीएम नव्हेतच असा खुलासा केला आहे. त्यामुळे याप्रकाराला आता नवे वळण मिळाले आहे.

याआधी दिल्ली विधानसभेच्या विशेष सत्रात आपचे  भारद्वाज यांनी एका मशीनचे प्रात्यक्षिक दाखवत इव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकत असल्याचा दावा केला. विधानसभेत भारद्वाज यांनी प्रात्यक्षिक दाखवत ज्या पक्षाला विजय मिळवून द्यायचा आहे, त्याचा एक सांकेतिक क्रमांक असतो. त्या सांकेतिक क्रमांकाचा वापर करत मशीनच्या मदरबोर्डमध्ये फेरफार केले जात असल्याचे भारद्वाज यांनी म्हटले होते. विधानसभेत भारद्वाज यांनी काही सांकेतिक क्रमांकही दाखवले. बटनांच्या साहायाने पक्षाचे कार्यकर्ते गुप्त सांकेतिक क्रमांक टाकतात, असा दावा भारद्वाज यांनी केला. प्रात्यक्षिकादरम्यान सांकेतिक क्रमांक टाकल्यानंतर १० लोकांनी झाडू या चिन्हाला मतदान केले. अशा पद्धतीने १० मते झाडू या चिन्हाला मिळणे अपेक्षित असताना इव्हीएमने सर्व मते भाजपला मिळाल्याचे दाखवले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नयना पुजारी अपहरण, बलात्कार प्रकरण : तीनही दोषींना फाशी