Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

फेसबूकच्या माध्यमातून हरवलेली म्हैस सापडली

फेसबूकच्या माध्यमातून हरवलेली म्हैस सापडली
, शनिवार, 9 डिसेंबर 2017 (17:05 IST)
एका व्यक्तीने फेसबूकच्या माध्यमातून आपली हरवलेली म्हैस शोधली आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरुतील होसकोटे येथील इस्तुरु गावात राहणाऱ्या एका व्यक्तीची म्हैस बेपत्ता झाली. म्हैस चरता-चरता गावातून दूर निघून गेली. त्यानंतर नारायण स्वामी यांनी आसपासच्या गावांमध्ये आणि परिसरात म्हैस शोधली मात्र काहीच कळलं नाही. त्यानंतर नारायण स्वामी यांना दोन दिवसांनी आपली म्हैस फेसबुक वॉलवर मिळाली.

 

नारायण स्वामी यांची हरवलेली म्हैस कोद्रहल्ली येथे राहणाऱ्या मोहनने पकडली. त्यानंतर मोहन याने आसपासच्या गावांत विचारणाही केली. पण ही म्हैस कुठल्या शेतकऱ्याची आहे हे कळलचं नाही. त्यानंतर मोहन यांनी म्हशीचा फोटो काढला आणि फेसबूकवर पोस्ट केला. तसेच फोटो कॅप्शनमध्ये म्हटलं 'ही म्हैस कुणाची आहे? शेअर करा आणि या म्हशीला तिच्या मालकापर्यंत पोहचवा'. ही पोस्ट अनेकांनी फेसबुकवर शेअर केली. अशाच प्रकारे ही पोस्ट नारायण स्वामी यांच्यापर्यंतही पोहोचली. नारायण स्वामी यांनी ही पोस्ट पाहिली आणि मग त्यांनी मोहन यांच्याशी संपर्क करत आपली हरवलेली म्हैस परत आणली.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, मुख्यमंत्री सुखरूप