Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कारखान्याची भिंत कोसळली, 12 कामगारांचा मृत्यू

कारखान्याची भिंत कोसळली, 12 कामगारांचा मृत्यू
, बुधवार, 18 मे 2022 (14:55 IST)
गुजरातमधील मोरबी येथील हलवाड औद्योगिक परिसरात मीठ कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.या कारखान्यात मीठ तयार करण्याचे काम सुरू होते. भिंत जुनी झाल्यामुळे ती कोसळली आणि त्याच्या खाली कामगार अडकले. अजून देखील ढिगाऱ्याखाली 30 कामगार अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. बचावकार्य सुरू आहे. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगार या मध्ये अडकले. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर अनेक जण दाबले गेल्याची भीती आहे. बचाव पथक घटनास्थळी असून भिंतीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
 
राज्याचे कामगार आणि रोजगार मंत्री आणि स्थानिक आमदार ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले की, हलवड औद्योगिक परिसरात असलेल्या मीठ तयार करण्याच्या कारखान्यात ही दुःखद घटना घडली. "कारखान्यातील किमान 12 कामगारांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत,"
या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता असून, बचावकार्य सुरू आहे. असे ते म्हणाले.
 
या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केले  आहे.
पीएम म्हणाले की ही हृदयद्रावक घटना आहे. या दु:खाच्या प्रसंगी ते शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, पीएमओने सांगितले की मृतांच्या आश्रितांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Women's T20 Challenge: स्मृती मंधाना , हरमनप्रीत आणि दीप्ती महिला टी-20 चॅलेंजमध्ये कर्णधार , 23 मेपासून पुण्यात या स्पर्धेला सुरुवात होणार