Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाजारात दोन प्रकाराचे चालत आहे 500च्या नवीन नोटा, बनावटाची शक्यता वाढली

बाजारात दोन प्रकाराचे चालत आहे 500च्या नवीन नोटा, बनावटाची शक्यता वाढली
बेंगलुरु , शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (16:59 IST)
500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचे चलन बंद झाल्याने बाजारात आले 500चे नवीन नोटांमध्ये अंतरावरून लोकांमध्ये भ्रमाची स्थिती निर्मित झाली आहे. कोणी म्हणत आहे की पाचशेच्या नवीन नोटा नकली आहे, तर कोणी याच्या छपाईलाच चुकीचे ठरवत आहे. तरी, 500च्या जुना नोटांचे प्रचलन बंद करण्यामागे सरकारची इच्छा काळा पैसांंवर रोख लावणे आणि बाजारात बनावटी नोटांच्या चलनावर रोख लावणे आहे, पण या प्रकारच्या नोटा बाजारात आल्याने याच्या बनावटी नोटांचे चलन वाढण्याची आशंका व्यक्त करण्यात येत आहे.  
 
देशात तीन असे प्रकरण समोर आले आहे, ज्यात 500च्या नवीन नोटांमध्ये एक दुसर्‍यांमध्ये अंतर बघण्यात आले आहे. यासाठी टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात तीन केस स्टडीचा उल्लेख केला आहे. या प्रकारे 500चे दोन वेग वेगळे नवीन नोटांमध्ये अंतर असण्याचे प्रकरण दिल्लीत राहणार्‍या अबशारचे आहे. अबशारचे म्हणणे आहे की एका नवीन नोटवर गांधींजी डबल शेडो दाखवण्यात येत आहे. त्याचे म्हणणे आहे की राष्ट्रीय चिह्नाच्या एलाइनमेंटमध्ये फरक आणि सीरियल नंबरमध्ये देखील गडबडी दिसून आली आहे.  
 
इंग्रजी वृत्त द टाइम्स ऑफ इंडियानुसार, गुड़गांव निवासी रेहान शाहने नोटातील बॉर्डरच्या साइजवर प्रश्न उचलला आहे. त्यांनी सांगितले की यात बरेच अंतर आहे. तसेच, मुंबईच्या एका व्यक्तीला 2000 रुपयांचे जे नोट मिळाले, त्या दोघांच्या रंगात फरक दिसला आहे. आधीच्या नोटांचे शेड थोडे कमी होते तर दुसर्‍या नोटमध्ये शेड जास्त दिसले.  
 
टाइम्स ऑफ इंडियाने 500 आणि 2000 रुपयांचे नवीन नोटांमध्ये अंतराच्या प्रकरणात आरबीआयच्या प्रवक्ता अल्पना किलावाला यांच्या बयानाचे उल्लेख केले आहे. किलावालानुसार, देशात नवीन नोटांची मारामारी जास्त असल्यामुळे नोटांच्या छपाईत गडबड असू शकते.  तरी , लोक याला बगैर कुठल्या शंकेचे स्वीकार करा किंवा याला आरबीआयला परत करू शकता.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

26 नोव्हेंबर हा 'संविधान दिन'