Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ढोंगी साधूने संमोहित करून केला बलात्कार

ढोंगी साधूने संमोहित करून केला बलात्कार
फरीदाबाद- हरयाणाच्या फरीदाबाद येथे एका ढोंगी बाबाने महिलेला संमोहित करून तिच्यावर बलात्कार केला. नंतर नवरा आणि मुलाचे प्राण घेण्याची धमकी देत तिच्याकडून दागिने हिसकावून घेतले.
 
पोलिस प्रवक्त्यानुसार फरीदाबाद रहिवासी एका महिलेने तक्रार केली आहे तिने काही दिवसांपूर्वी घरी ललितानंदकडून भागवत कथा आयोजित केली होती. तेव्हापासून ललितानंद त्याच्याकडे येऊ लागला. एके दिवशी त्याने कपाळावर अंगठा लावून तिला संमोहित केले आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतरही तो तिच्यावर बलात्कार करत राहिला.
तिने सांगितले की ललितानंद रोज दारू पिऊन मारहाण करायचा. त्याने धमकावून तिच्याकडून पैसे आणि दागिनेही हिसकावून नेले आणि तो कुटुंबाला नुकसान करण्याची भाषा करत आहे. पोलिस प्रकरणाची तपासणी करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहीद दिन विशेष : शिवराम राजगुरू