Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

FARC व कोलंबिया सरकारात होणार्‍या शांती कारारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमात श्री श्रींना आमंत्रण

FARC व कोलंबिया सरकारात होणार्‍या शांती कारारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमात श्री श्रींना आमंत्रण
बंगळूरू , शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (10:45 IST)
कोलंबियाचे अध्यक्ष आणि FARC चे नेते यांच्या आमंत्रणानुसार, गुरुदेव श्री श्री रविशंकर हे FARC आणि कोलंबिया सरकार यांच्यात होणाऱ्या शांती कारारावर स्वाक्षरी करण्याच्या ऐतिहासिक कार्यक्रमास, कार्टाजेना दे इंडियास, कोलंबिया येथे हजार रहाणार आहेत. जगभरातील १५ हून अधिक राष्ट्रांचे प्रमुख २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास हजार रहाणार आहेत. (श्री श्री हे पूर्वेकडून जाणारे एकमेव आध्यात्मिक गुरु आहेत)
 
कोलंबियाचे अध्यक्ष जुआन सांतोस यांनीही श्री श्रींच्या शांतीसाठी केलेल्या प्रयत्नाची प्रशंसा करताना असे जाहीर केले आहे की “ श्री श्री रविशंकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग शांतीचे हिरो आहेत.” 
 
कोलंबियाच्या भारतातील राजदूत, रा. रा. श्रीमती मोनिका लेन्झेता मुटीस म्हणाल्या, “ या वर्षी २४ ऑगस्ट रोजी FARC आणि कोलंबिया सरकार यांच्यात झालेल्या ऐतिहासिक करारामुळे कोलंबिया, श्री श्री रविशंकर यांच्या मौल्यवान मदतीबद्दल अतिशय आभारी आहे. 
 
आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत मानवतावादी प्रकल्प आणि तणावमुक्ती शिबिरे घेतली जातात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑपरेशन उरण : नेव्हीने थांबविले