suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंजाबमध्ये भीषण बस अपघात; 6 भाविकांचा मृत्यू तर 21 जण गंभीर जखमी

Punjab News
पंजाबमधील फतेहगड साहिब येथे आनंदपूर साहिबहून परत येत असताना यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस उलटली. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ALSO READ: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १५ एप्रिल रोजी नागपूरच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार
मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधील बस्सी भागातील यात्रेकरूंचा एक गट बैसाखीच्या दिवशी आनंदपूर साहिबला भेट देण्यासाठी गेला होता. परत येत असताना बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. जखमींपैकी नऊ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस, प्रशासन, आणि पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. हा अपघात मंगळवारी रात्री पंजाबमधील बस्सी पठाणा येथील मोरिंदा-चुन्नी रस्त्यावरील हिम्मतपुरा जवळ घडला.  
ALSO READ: भाजपचे सम्राट चौधरी आज बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमरावती : १८० मुलींवर लैंगिक अत्याचार, सूत्रधार आणि दोघांना अटक; मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले