Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फॅब इंडियाने 'खादी' ब्रँडनेमचा वापर बंद केला

फॅब इंडियाने 'खादी' ब्रँडनेमचा वापर बंद केला
, सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (17:17 IST)
फॅब इंडियाने  सुती कपड्यांच्या प्रचारासाठी खादी या ब्रँडनेमचा वापर करण्याचे बंद केले आहे. याबाबत खादी इंडियाने फॅब इंडियाला नोटिस दिली होती. आमच्या खादी या शब्दाच्या वापराने ब्रँडनेमचा दुरुपयोग केला जात असल्याचे खादी इंडियाचे म्हणणे होते. खादी व ग्रामोद्योग आयोगाने फॅब इंडिया ओव्हरसीज प्रायव्हेट लि. या कंपनीला ही कायदेशीर नोटिस पाठवली होती. त्यांनी फॅब इंडियाच्या सर्व दुकानांमधूनही अशा ब्रँडनेमचा वापर असणारे सर्व बॅनर काढून टाकण्यासही सांगितले होते. दरम्यान, फॅब इंडियाने खादी ग्रामोद्योगाकडे या संबंधात चर्चेसाठी वेळ मागितला असून त्यांना फॅब इंडियाची बाजू मांडायची आहे, असे सांगण्यात आले. खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी सांगितले की फॅब इंडियाने २९ सप्टेंबर २०१६ रोजी पत्र पाठवले होते. त्यांनुसार त्यांच्या मागणीप्रमाणे अनेकदा खादी ग्रामोद्योगाच्या अधिकार्‍यांबरोबर फॅब इंडियाच्या प्रतिनिधींच्या बैठकी झाल्या आहेत अखेरची बैठक २ ऑगस्ट २०१६ रोजी झाली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बचत खात्यातून आठवड्याला 50 हजारापर्यंत रक्कम काढता येणार