Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासूच्या कटकटीला कंटाळून 3 सुनांनी केली हत्या

webdunia
गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (10:55 IST)
सासूच्या कटकटीला कंटाळून तीन सूनांनी तिची हत्या केली आणि नंतर आत्महत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधल्या जोधपूर जिल्ह्यातलं हरयाल गाव येथे घडली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्या तीनही सूनांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. आता त्यांना जेलची हवा खावी लागते आहे.

हरयालच्या एका कुटुंबात तीन सूना आपल्या सासू सोबत राहत होत्या. सासू दररोज कट कट करते याचा राग तीनही सूनांना येत होता. यातून सुटका करण्यासाठी त्या सूनांनी सासूची गळा आवळून हत्या केली. आणि तिचा मृतदेह पंख्याला अटकवून ठेवला आणि त्या आपापल्या खोल्यांमध्ये गेल्या.

घरी काही मंडळी आल्यानंतर त्यांनी खोली उघडून पाहिलं त्यावेळी त्यांना आई ही पंख्याला लटकलेली दिसली. त्यानंतर तिथे तिही सुना आल्या आणि त्यांनी रडण्याचं नाटक केलं.पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं मत व्यक्त केलं गेलं नंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सूनांनी गुन्हा कबुल केला. त्या तिघिंची कोरोना चाचणी करून त्यांनी जेलमध्ये पाठविण्यात आलं आहे.

त्या तिघिंनी संगनमत करून सासूचा काटा काढायचं ठरवलं आणि योजना तयार केली. सासू आराम करत असतांना त्या तिघीही तिच्याजवळ गेल्या आणि उशी आणि कापडाच्या साह्याने सासूचा गळा आवळून हत्या केली.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

PM Twitter: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक झाले, लवकर झाले रिकवर