Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाबा रामदेव यांच्यासह चौघांविरोधात एफआयआर

बाबा रामदेव यांच्यासह चौघांविरोधात एफआयआर
, शनिवार, 27 जून 2020 (16:11 IST)
जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कोरोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
 
बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाचे लाँचिंग केलं. ‘कोरोनिल’आणि ‘श्वासारी’या औषधामुळे रुग्णपुर्णपणे बरा होतो. याचा प्रयोग १०० रुग्णांवर करण्यात आला. ३ दिवसात ६९ टक्के पॉझिटिव्ह रूग्ण निगेटिव्ह झाले, अशी माहिती योगगुरू रामदेव बाबा यांनी पत्रकारपरिषदेत दिली.  त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्यांचे सर्व रिपोटर्स मागवले तसेच कोरोनामधून मुक्ती देणारे औषध अशी जाहीरात बंद करण्याचेही आदेश दिले.
 
जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात कोरोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयर नोंदवण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाची कुष्णकुंजवर पुन्हा एन्ट्री