Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेन्नईत एअर शोदरम्यान चेंगराचेंगरी, गुदमरल्याने पाच जणांचा मृत्यू

चेन्नईत एअर शोदरम्यान चेंगराचेंगरी, गुदमरल्याने पाच जणांचा मृत्यू
, सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (11:16 IST)
चेन्नईच्या मरीना एअर फील्डवर झालेल्या एअर शोमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर शोदरम्यान पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर उष्माघातामुळे 100 हून अधिक जणांची प्रकृती खालावली. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. 
 
92 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी, भारतीय वायुसेनेने आज तामिळनाडूमधील चेन्नई मरीना एअरफील्डवर एअर ॲडव्हेंचर शो आयोजित केला. 21 वर्षांत प्रथमच, चेन्नईने हवाई दल दिन सोहळ्याचे आयोजन केले. कडाक्याच्या उन्हात एअर शो पाहण्यासाठी हजारो लोक आले होते.

एअर शोमध्ये सुमारे 15 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एअर शो संपल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे अनेक लोक बेशुद्द्ध  झाले. या लोकांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.दुपारी शो संपल्यानंतर मरीना एअर फिल्डमधून प्रचंड जनसमुदाय बाहेर पडला. त्यामुळे रस्ते, मेट्रो, रेल्वे स्थानके खचाखच भरलेली दिसून आली. कार्यक्रमस्थळी पाण्याची व्यवस्था नसल्याने कडक उन्हात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला तर शेकडो लोकांची प्रकृती खालावली.

सकाळी 11 वाजल्यापासूनच रसिकांनी मरीना बीचवर गर्दी केली होती . यातील अनेकांनी छत्र्या घेऊन उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. एअर शोची सुरुवात भारतीय हवाई दलाच्या स्पेशल गरुड फोर्सच्या कमांडोजनी मोक रेस्क्यू ऑपरेशन आणि ओलिस मुक्त करण्यात आपले धाडसी कौशल्य दाखवून केले.

AIADMK नेते एडप्पादी के पलानीस्वामी यांनी ट्विटरवर एअर शो दरम्यान झालेल्या गोंधळाबाबत पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, भारतीय हवाई दलाच्या 92 व्या वर्धापनदिनानिमित्त चेन्नईमध्ये एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. याबाबतची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती.

एअर शो पाहण्यासाठी लाखो लोक येतील, असे तामिळनाडू सरकारने सांगितले होते.मात्र कार्यक्रमातील प्रशासकीय यंत्रणा आणि वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले नाही.

पोलिस बंदोबस्तही अपुरा होता.भारतातील विविध शहरांमध्ये आतापर्यंत हवाई दलाचे कार्यक्रम चांगले चालले आहेत, परंतु तामिळनाडूतील घटनेत जीवित आणि मालमत्तेची हानी होणे अत्यंत दुःखद आहे. या कार्यक्रमासाठी योग्य सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मी एमके स्टॅलिन सरकारचा तीव्र निषेध करतो.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामाचं नाव घेतलं तर महिलेच्या गळ्यात पडला माकड, Viral Video पाहून सर्व हैराण