Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू

Death
, सोमवार, 6 जानेवारी 2025 (10:51 IST)
srinagar news : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील पंद्रेथान परिसरात रविवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील, आई आणि त्यांच्या तीन मुलांसह पाच जणांचा समावेश आहे.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. मृत कुटुंब श्रीनगरमधील पंद्रेथान भागात भाड्याच्या घरात राहत होते. कुटुंबातील पाच जण बेशुद्ध झाले आणि गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील पाचही सदस्य गुदमरल्यामुळे घरात बेशुद्धावस्थेत आढळले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेचपोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM मोदी आज विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करणार