Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Assam Floods:आसाम मध्ये पुराचा हाहाकार, 108 लोकांचा मृत्यू, 54 लाखांहून अधिक प्रभावित

Assam Floods:आसाम मध्ये पुराचा हाहाकार, 108 लोकांचा मृत्यू, 54 लाखांहून अधिक प्रभावित
, बुधवार, 29 जून 2022 (13:41 IST)
आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आणखी सात जणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यानंतर पुरात मृतांची एकूण संख्या १०८ झाली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आदल्या दिवशी त्यांनी पूरग्रस्त सिलचरचा हवाई दौरा केला. 30 जिल्ह्यांतील 35 लाखांहून अधिक लोकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मात्र, एका दिवसापूर्वी 32 जिल्ह्यांमध्ये हा आकडा 54 लाखांच्या पुढे होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीही राज्यातील सध्याच्या पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या 15,188 लोकांनी 147 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
 
आसामचा बारपेटा जिल्हा सर्वात जास्त प्रभावित हाल असून तब्बल 12,51,359  लोक प्रभावित झाले आहे. धुबरी मध्ये 5,94,708 जण आणि दर रंग येथे 5,47,421 जण पूरग्रस्त झाले आहे.  आसाम पुरात 1083306.18 हेकटर पेरणी क्षेत्र, आणि तब्बल 36,60,173 जनावरे पुरबाधित झाली आहे. तर ७ ठिकाणी बंधारे ,रस्ते आणि पुलाचे नुकसान झाले आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे गटाने दिले 51 लाख रुपये