Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जन्मानंतर आईने मुलाला टॉयलेटमध्‍ये केले फ्लश

जन्मानंतर आईने मुलाला टॉयलेटमध्‍ये केले फ्लश
एका आईचे हृदय इतके कठोर कसं होऊ शकतं, ही बातमी वाचल्यावर आपल्याही मेंदूत हा विचार नक्की येईल. परिस्थिती यासाठी कारणीभूत आहे हे म्हणणेही चुकीचे नाही. नवरा मेल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला आणि अवांछित गर्भाचं तिच्या जीवावर ओझं आलं.
 
मूल जन्माला आला तर आईने कठोर हृदयाने त्याला टॉयलेट फ्लशमध्ये वाहवून दिलं. एका नर्सने कमोडमध्ये लहानसा हात बघितला आणि खूप प्रयत्न करून त्याला बाहेर काढले गेले. पण त्या निष्पाप जीवालाही असे जीवन जगायचे नव्हते म्हणून दोन दिवस जगल्यानंतर त्याने दुनियेला अलविदा केले.
 
मध्यप्रदेशाच्या भोपाळच्या जेजे रूग्णालयात ही घटना घडली. येथे राहणार्‍या 19 वर्षीय महिलेचा नवर्‍याची मृत्यू झाली होती. बलात्काराला बळी पडून ती गर्भवती झाली. आधीतर तिने औषधं घेऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला पण यश हाती लागले नाही. प्रसव पीडेमुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. ती लेबर रूम मधून बहाणा करून टॉयलेटला गेली. 
 
नर्सला शंका आली आणि म्हणून ती टॉयलेटमध्ये गेली तर नवजात कमोडमध्ये पडलेला होता. तेव्हा चिमुकल्याचा केवळ हात दिसत होता. नर्सने त्याला खेचून बाहेर काढले. मूल जिवंत होता परंतू त्याला एसएनसीयूमध्ये भरती करण्याऐवजी किंवा मोठ्या रूग्णालयात न पाठवता आईजवळ ठेवण्यात आले. श्वासाचा त्रास झाल्यामुळे नंतर एसएनसीयूमध्ये भरती करवले. या प्रकरणाची पोलिसांनाही सूचना देण्यात आली नव्हती. परंतू शेवटी मूल वाचले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

VIP दारू पार्टीत रेड, IPLचे माजी कमिशनर चिरायू अमीन देखील सामील