explosion in a soap factory in Meerut उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका साबण कारखान्यात झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचारी सक्रिय झाले असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील सत्यकम इंटरनॅशनल स्कूलजवळ हा स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच डीएम आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले. स्फोटानंतर इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे.