Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जयललितांच्या ADMKवर वर्चस्व मिळवण्यासाठी पलानीसामी आणि पनीरसेल्वम समर्थकांमध्ये फ्री स्टाईल

जयललितांच्या ADMKवर वर्चस्व मिळवण्यासाठी पलानीसामी आणि पनीरसेल्वम समर्थकांमध्ये फ्री स्टाईल
, सोमवार, 11 जुलै 2022 (18:54 IST)
तामिळनाडूचे दोन माजी मुख्यमंत्री एडाप्पाडी के. पलानीसामी आणि ओ. पनीरसेल्वम यांच्या समर्थकांमध्ये सोमवारी (11 जुलै) जोरदार हाणामारी झाली. चेन्नईमध्ये AIADMK पक्षाच्या मुख्यालयासमोरच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
 
चेन्नईतील वनग्रामम इथे पक्षाच्या सर्वसाधारण सभेची बैठक होणार होती. या बैठकीआधीच पक्षातील दोन गटांमधले मतभेद अशारीतीने आमनेसामने आले की दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही बैठक अतिशय महत्त्वाची होती कारण यामध्ये पक्षाच्या सरचिटणीसांची निवड होणार होती.
 
पलानीसामी आणि पनीरसेल्वम यांच्यामध्ये गेल्या काही काळापासूनच सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. पनीरसेल्वम आणि पलानीसामी हे अनुक्रमे पक्षाचे समन्वयक आणि सहसमन्वयक आहेत.
 
मात्र, पक्षात एकच खंबीर नेतृत्व असावं अशी पक्षाच्या सदस्यांची गेल्या काही काळांपासूनची मागणी आहे. कारण दोन सत्ताकेंद्रांमुळे पक्ष कमकुवत असल्याचं सदस्यांना वाटत होतं.
 
या वादळी घटनाक्रमानंतर झालेल्या बैठकीत पलानीसामी यांची पक्षाचे अंतरिम सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
23 जूनला पक्षाची एक बैठक झाली होती. त्या बैठकीच्या आधीही एआयएडीएमकेच्या दोन्ही नेत्यांचे समर्थक हमरीतुमरीवर आले होते. या बैठकीतही एकाच व्यक्तीकडे नेतृत्व सोपविण्याची मागणी झाली होती. पनीरसेल्वम हे बैठक अर्ध्यावर सोडून गेले होते.
 
त्यानंतर या बैठकीनंतर पलानीसामी यांच्या समर्थकांनी सोमवारी (11 जुलै) सर्वसाधारण सभेची बैठक बोलावण्याची मागणी केली. दुसरीकडे या बैठकीवर बंदी घालावी यासाठी पनीरसेल्वम यांच्या समर्थकांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
 
पण न्यायालयाने या बैठकीला परवानगी दिली.
 
या बैठकीसाठी पनीरसेल्वम एआयएडीएमके पक्षाच्या कार्यालयात सोमवारी सकाळी पोहोचले. त्यांचे काही समर्थकही त्यांच्यासोबत होते. पलानीसामी यांचे समर्थकही पक्ष कार्यालयाच्या इथे उपस्थित होते.
 
दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते अशारीतीने समोरासमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. दगडफेकीचेही प्रकार घडले. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीलंकेच्या खेळाडूंचा पराक्रम; देशात अराजक, कामगिरी दमदार