Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या
, बुधवार, 6 सप्टेंबर 2017 (11:21 IST)

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश (55) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बंगळुरुतील राहत्या घराबाहेर त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत्या घरी मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास तिघा आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यानंतर  झालेल्या वादावादीत आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढला. यात  मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली.गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.

कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गेल्यावर्षी  गौरी यांच्याविरोधात मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता. 2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डेरा मुख्यालयात मोठा शस्त्रसाठा