पंजाबमधील पटियाला येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने एका 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर बेकरी मालकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, मानवीच्या वाढदिवसादिवशी 24 मार्च रोजी पटियाला येथील एका बेकरीतून केक ऑनलाइन ऑर्डर करण्यात आला होता. सायंकाळी 7 च्या सुमारास केक कापून सर्वांनी जेवले. त्याच दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत संपूर्ण कुटुंब आजारी पडले. मानवी आणि तिच्या लहान बहिणीला उलट्या होऊ लागल्या.
मुलीचे आजोबा हरबन लाल यांनी सांगितले की, मानवीने खूप तहान लागत असल्याची तक्रार केली आणि तिने पाणी मागितले. यानंतर ती झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिला ऑक्सिजन देण्यात आला आणि ईसीजी करण्यात आला, मात्र मानवीला वाचवता आले नाही. केकमध्ये काही विषारी पदार्थ असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बेकरी मालकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकचा नमुनाही तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच काही सांगता येईल.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.