Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देव तारी त्याला कोण मारी! गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही,व्हिडिओ व्हायरल झाला

देव तारी त्याला कोण मारी! गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही,व्हिडिओ व्हायरल झाला
, बुधवार, 14 जुलै 2021 (11:53 IST)
गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेश,राजस्थान,मध्य प्रदेशसह बर्‍याच राज्यात वीज कोसळल्याने सुमारे 100 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मंगळवारी गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरात वीज कोसळल्याची घटना घडली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंदिरात वीज पडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु यात कोणाचेही नुकसान झाले नाही.केवळ मंदिराच्या ध्वजाचे नुकसान झाले आहे. 

मंदिरात वीज पडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे पाहून अनेकांनी म्हटले आहे की भगवान द्वारकाधीशांनी आपल्या भक्तांना मेघगर्जनापासून वाचवले.असं म्हणतात की 'ज्याला देव तारी,त्याला कोण मारी' हे वाक्य आज सिद्ध झाले.
 
वीज कोसळण्याच्या वेळी मंदिरात उपस्थित अनेक लोकांनी या घटनेचे वर्णन करुन सांगितले की ते त्यावेळी पूजा करीत असताना अचानक हवामान खराब झाले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. ढग गर्जना करीत होते आणि त्यादरम्यान मंदिरावर वीज कोसळली .या घटनेमुळे मंदिराच्या आवारात कोणतेही नुकसान झाले नसले,तरी मंदिराच्या वर फडकणारा ध्वज नक्कीच प्रभावित झाला आणि थोडासा फाटला.वीज कोसळल्यानंतर मंदिर संकुलाचे प्रशासनाने तपास केले आहे,परंतु कोणतेही नुकसान झाले नसल्याचे आढळून आले.
 
यापूर्वी सोमवारी उत्तर प्रदेश,राजस्थान आणि मध्य प्रदेशात पावसाने कहर केला होता. उत्तर प्रदेशात 38 मृत्यू तर राजस्थानात पावसाळी वीज कोसळल्याने 20 जणांचा बळी गेला आहे. मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या भागात वीज कोसळल्याने आतापर्यंत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदींच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.  या दिवसात देशाच्या विविध भागात पावसाचा जोर कायम आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी वीज कोसळली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंग्लंड विरुद्ध शतक लावून बाबर आझमने जोरदार पुनरागमन केले, विश्वविक्रम केला