हा प्रतिबंध देव देवता व महिलांच्या नावासाठी नसल्याचे विधान परिषदेत दिलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरामुळे समोर आले आहे. राज्यातील बिअरबार, दारू दुकाने आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच, गडकिल्ल्यांची नावे दिली जातात. हा महापुरुषांचा अवमान असून, राज्याच्या संस्कृतीला शोभणारे हे चित्र नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी गेल्यावर्षी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे देशी दारू, बिअरबारला महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती. आमदार पंडित यांच्या सूचनेनंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी राज्यातील बिअरबार आणि दारू दुकांनाना महापुरुष व गडकिल्ले यांची नावे देण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिसूचनेचे प्रारुप व विधी व न्यायविभागाच्या अभिप्राय व सहमतीसाठी सादर केलेले आहे.
देव-देवता यांची नावे बिअरबार व दारूविक्री केंद्रांना देण्यास प्रतिबंध कसा करता येईल याबाबत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मागविण्यात आले असून, त्यामुळे यावर अजून निर्णय झालेला नाही असे उत्तर दिले आहे. या उत्तरामुळे देव-देवता व महिलांच्या नावाचा वापर दारू दुकान व बिअरबारला करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.