Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिस चौकशीत ढसाढसा रडले दाती महाराज, आता पोटेंसी टेस्टची तयारी

पोलिस चौकशीत ढसाढसा रडले दाती महाराज, आता पोटेंसी टेस्टची तयारी
दिल्ली पोलिसच्या क्राईम ब्रांचने दुष्कर्म आरोपी दाती महाराजांशी शुक्रवारी सुमारे 11 तास चौकशी केली. या दरम्यान 250 हून अधिक प्रश्न विचारले गेले. प्रश्नांमुळे परेशान दाती महाराज तुटून गेले आणि ढसाढसा रडले.
 
दाती महाराज यांनी म्हटले की आरोप लावणारी त्याच्या मुलीसारखी आहे. तिच्यासह दुष्कर्म करण्याचा विचारही मनात येऊ शकत नाही. त्यांनी म्हटले की ती यौन संबंध ठेवण्या योग्य नाही. मात्र त्यांचे उत्तर ऐकून पोलिस संतुष्ट नाही.
 
पोलिसांनी त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. महाराजांनी ज्या दोन माजी सेवकांवर पेश्यांसाठी फसवण्याचा आरोप लावला आहे त्यांचीही चौकशी केली जाऊ शकते. पोलिस महाराजांची पोटेंसी टेस्ट देखील करवू शकते.
 
गुरुकुलमध्ये अनियमितता: राजस्थान महिला आयोग द्वारे आपल्या शिष्यासोबत दुष्कर्म करण्याच्या आरोप अडकलेले नवी दिल्ली स्थित शनिधाम मंदिराचे संस्थापक दाती मदन महाराजांच्या पाली जिल्ह्याच्या आलावास स्थित गुरुकुलमध्ये अनेक अनियमितता समोर आल्या आहेत. आश्रम स्थित स्कूल आणि कॉलेजचा मागील 3 वर्षापासून रजिस्ट्रेशन नूतनीकरण केले गेले नाहीये.
 
गुरुकुल तर्फे सांगण्यात आले आहे की येथे सुमारे 800 मुली राहतात आणि परंतू सध्या मुलींची संख्या विचारल्यावर केवळ 150 मुली असल्याचे कळून आले. नंतर आयोग टीमच्या तपासणीत तेथे 253 मुली सापडल्या.
 
गुरुकुलमध्ये मुलींचे रेकॉर्ड नाही. केवळ एक रजिस्टरमध्ये त्यांचे नाव लिहिले आहे. वडिलांचे नाव त्यात वेगळे आणि शपथ पत्रात वेगळे दिसून आले. मुलींच्या वयात देखील चुकीची नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विवाहितेचा छ्ळ, तीन न्यायाधीशांवर गुन्हा दाखल