Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुश्तैनी सोन्याचा पुरावा देण्याचे सात मार्ग

पुश्तैनी सोन्याचा पुरावा देण्याचे सात मार्ग
नोटबंदीनंतर सरकारने सोनं ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. प्रत्येक विवाहित महिला 500 ग्राम, अविवाहित महिला 250 ग्राम आणि पुरूष 100 ग्राम सोनं ठेवू शकतात. या दरम्यान पसरत असलेल्या अफवांना ब्रेक लावत वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पुश्तैनी दागिने आणि घोषित उत्पन्न द्वारे खरेदी केलेल्या सोन्यावर कर लागणार नाही. आता आपलं सोनं पुश्तैनी आहे की नाही याचा पुरावा देण्यासाठी सात मार्ग आहेत:
1. जर आपल्याकडे पुश्तैनी सोन्याचे दागिने आहे आणि त्याची नोंद 2014-15 च्या संपत्ती करमध्ये केलेली आहे तर ते सोनं वैध मानले जाईल. पण आपल्याकडे याची रसीद असली पाहिजे.
 
2. पुश्तैनी सोनं आपलं आहे की नाही, यासाठी आपल्याला वारसात मिळाले असल्याचे स्पष्ट करू शकता. आपल्या पूर्वजांनी मृत्युपत्रात आपल्या नावावर केलेली नोंद पुराव्यासाठी योग्य ठरेल.
 
3. जर कोणी गिफ्ट म्हणून आपल्याला सोनं किंवा दागिने दिले असतील तर त्याची रसीद स्वत:जवळ ठेवावी.
 
4. जर आपण पुश्‍तैनी दागिन्यांचं टॅक्स दिलं नसेल तर त्याच्या मूल्यांकनाची रिपोर्ट द्यावी लागेल. तसेच दागिने मोडून पुन्हा तयार करवले असतील तर त्याची रसीद स्वत:कडे ठेवावी.
 
5. जुन्या आणि नव्या सोन्यात खूप फरक असतो. अशात जुन्या सोन्याचे फोटो काढून आपल्याजवळ ठेवून घ्यावे. ज्याने स्पष्ट कळेल की हे सोनं आपण खरेदी केलेले नाही.
 
6. जर आपण आपल्याकडे असलेल्या सोन्याचा विमा करवला असेल तर त्याचे पेपर पुरावा म्हणून प्रस्तुत करू शकता.
 
7. ज्या लोकांकडे पुश्‍तैनी सोनं किंवा दागिने गहाण टाकले असती त्यांनी त्याची रसीद पुरावा म्हणून द्यावी.
 
 
जाणून घ्या सोन्यासाठी नवीन नियम:

* सरकारने घरात सोनं ठेवण्यासाठी नवीन नियम जारी केले आहे आणि आपल्या आयच्या हिशोबाने सोनं ठेवण्यात कुणालाही धोका नाही. वित्त मंत्रालयाप्रमाणे आपली घोषित आय आणि घरगुती बचतने खरेदी केलेलं सोनं किंवा दागिन्यांवर कर लागणार नाही.
 
* नवीन नियमांप्रमाणे विवाहित महिलांजवळ 500 ग्राम पर्यंतचा हिशोब मागितला जाणार नाही.
 
* विवाहित महिलांचा 500 ग्राम पर्यंतचे सोनं जप्त होणार नाही.
    
* तसेच अविवाहित मुली 250 ग्राम सोनं ठेवत असली तरी ती आयकर चौकशीपासून वाचेल. तसेच एका घरात 100 ग्राम पर्यंत पुरुषांचे दागिने मिळाल्यास हिशोब मागितला जाणार नाही.
 
* घरात ठेवलेले पुश्तैनी दागिने किंवा सोन्यावरही कर लागणार नाही. याचा हिशोब दाखवल्यावर आयकर विभागाकडून छापेमारीत सवलत मिळेल.
 
* ब्रँडेड आणि अनब्रँडेड शिक्क्यांवरही 12.5 टक्के इंपोर्ट ड्यूटी लावण्याची घोषणा झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेगावर ताबा, अपघात टाळा