Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन
, बुधवार, 22 मार्च 2017 (10:18 IST)
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध स्तंभलेखक गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेत निधन झाले.  अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास होते. मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचे नाव प्रसिद्ध होते. गोविंद तळवलकरांनी 1947 साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे 1950 ते 1962 अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. 1962-67 च्या दरम्यान त्यांना 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1968 मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे 1996 पर्यंत म्हणजे तब्बल 27 वर्षे ते 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक होते.   टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सैयदा महापाराने अशक्य गोष्ट केली