Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाबा राम रहीममुळे पोस्ट ऑफिस त्रस्त

बाबा राम रहीममुळे पोस्ट ऑफिस त्रस्त
साध्वी बलात्कार प्रकरणात दोषी डेरा सच्चा प्रमुख गुरमीत सिंह राम रहीम मागील एक वर्षापासून सुनारिया तुरुंगात बंद आहे. बाबाला सीबीआय कोर्टाने मागील वर्षी 28 ऑगस्ट रोजी 10-10 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. पण बातमी ही आहे की जेलमध्ये बंद बाबामुळे पोस्ट ऑफिसचा त्रास वाढला आहे. 
 
राम रहीमच्या वाढदिवसाला अनुयायांकडून पाठवण्यात आलेल्या ग्रीटिंग कार्ड्सचा जेलमध्ये ढीग लागला आहे. ग्रीटिंग्स पाठवणे सुरूच असून त्यांचे वजन सुमारे एक टन आहे. कार्ड हरयाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासह इतर राज्यांतून स्पीड पोस्ट, रजिस्ट्री आणि इतर पोस्टाहून येत आहे. यामुळे टपालकचेरीतील कर्मचार्‍यांना ड्यूटीव्यतिरिक्त इतर तास अधिक काम करावे लागत आहे.
 
जेलमध्ये 90 टक्के पोस्ट बाबाचे असतात. पोस्टमनप्रमाणे मागील दहा वर्षात एकाच व्यक्तीला इतके ग्रीटिंग कार्ड्स कधीच वाटण्यात आलेले नाही. ग्रीटिंग कार्ड्समध्ये लव्ह यू पापा, तुम जियो हजारो साल, मिस यू पापा, तुम्ही लवकर बाहेर या सारखे संदेश लिहिलेले आहेत. हे संदेश अगदी साध्या कागद ते महागड्या कार्ड्समध्ये लिहिलेले येत आहेत.
 
पोस्ट विभागाला हे ग्रीटिंग्स पोहचवण्यासाठी अतिरिक्त रिक्षा करावी लागते. यामुळे तुरुंगातील कामगारागंचे काम देखील वाढले आहे. बोर्‍यात भरून आलेल्या ग्रीटिंग्स चेक करायला अधिक वेळ द्यावा लागत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छोटा शकीलचा मुलगा अध्यात्माकडे वळला