आजपासून श्राद्धपक्ष सुरु झालं आहे. पुढील 15 दिवसानंतर नवरात्रोत्सव सुरु होणार असून देवीच्या मंदिरात, ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाची धामधूम असणार. काही ठिकाणी देवीच्या मुर्त्या बसवतात आणि जत्रे लागतात.
काल अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.गणेशोत्सवात देखील ठीक ठिकाणी जत्रे भरले होते. या जत्र्यात मोठे मोठे आकाशपाळणे येतात. आकाश पाळण्यात बसणे अनेकांना आवडते. गुजरातच्या खंभालिया या ठिकाणी एका आकाशपाळण्यात बसणे एका तरुणीला चांगलेच भोवले आहेत.
या तरुणीचे केस आकाशपाळण्यात अडकले केसांना सोडवण्यासाठी चाकूने केसांना कापावले लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ गुजरातच्या एका जत्र्यातील आहे. या व्हिडीओ मध्ये एक तरुणी मोकळे केस सोडून आकाश पाळण्यात बसली .आकाश पाळणा सुरु झाल्यावर त्या मुलीचा आरडाओरड करण्याचा आवाज आला. आकाश पाळणा लगेच थांबवण्यात आला.
लोकांनी वर बघितल्यावर त्यांना धक्काच बसला. या तरुणीचे केस आकाश पाळण्यात अडकले होते. दोन तरुण वर चढले आणि त्यांनी सुरीने केसांना कापून तरुणीची सुटका केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला असून यावर नेटकऱ्यानी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही मुली लिहितात की आता ही मोकळे केस सोडून कधीही राहणार नाही.