गुजरात राज्यसभा निवडणुकीप्रकरणी गुजरात हायकोर्टाने सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावाली. २१ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यावे असे निर्देश हायकोर्टाने या सर्वांना दिले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या उमेदवाराने दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बलवंतसिंह राजपूत यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला होता. भाजपने निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात राजपूत यांना उमेदवारी दिली होती. नाट्यमय घडामोडींनी निवडणुकीत रंगत आली आणि पटेल यांनी विजय मिळवला आहे.