गुजरातमधील वडोदरा शहरात बिबट्याच्या दहशतीने थैमान घातले आहे. दरम्यान, वडोदरा येथील लिमखेडा तालुक्यात एका 10 वर्षीय मुलीच्याधाडसाचे कौतुक होत आहे. या मुलीने आजीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. हीरल चौहान असे या धाडसी मुलीचे नाव असून तिने लढा देऊन आपली आजी चंपाबेन चौहान (60) यांना वाचवले.
दाहोद जिल्ह्यातील एका दुर्गम गावात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.ही धाडसी मुलगी दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील पाडा गावात राहत असून इयत्ता पाचवीत शिकते. घटनेच्या वेळी ती आजी चंपाबेन चौहान यांच्याजवळ घराबाहेर झोपल्या असताना बिबट्याने येऊन चंपा चौहान यांचे डोके जबड्यात दाबले. अचानक झालेल्या या हल्ल्याचे काय झाले हे चंपाला लगेच कळले नाही. त्या उठल्या आणि वेदनेने ओरडू लागल्या.
बिबट्या आजीला ओढू लागला पण हिरलने तिच्या आजीला घट्ट धरून ठेवले आणि ती जोराने ओरडू लागली जेणे करून तिच्या मदतीसाठी कोणी येईल. हिरलचा आवाज एकूण शेजारचे धावत आले आणि बिबट्याने तावडीतून आजीला सोडले आणि पळ काढला. या सर्व प्रकरणात आजीचे प्राण वाचले पण डोक्याला दुखापत झाली. चंपाबेन यांना प्रथम दाहोद शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे काही वेळाने आजीला सोडण्यात आले. हिरलच्या धाडसेंचे सर्वत्र कौतुक होत आहे.