Gujrat:गुजरातच्या अमरेलीमध्ये शेतकरी शेतीसह गीर प्रजातीच्या गायी आणि बैलांचे पशुपालन करतात. आणि लाखो रुपये कमावतात. गोशाळेत एक बैल आहे या गोशाळेत गायी, म्हशी आणि बैलांची देखभाल केली जाते. या गोशाळेत मुर्रा जातीचे काही बैलांची किमती खूप जास्त असतात. या गोशाळेत एका बैलाची किंमत एखाद्या लक्झरी कार पेक्षा अधिक आहे.
राघव नावाच्या बैलाची किंमत 45 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्याचे खाणे पिणे एखाद्या राजासारखे आहे. त्याची विशेष काळजी घेतली जाते.
अमरेली मध्ये सावरकुंडा तालुक्यात अमृतवेल गावात खोडियार माताजी मंदिरात एका गोशाळेत राघव नावाच्या बैलाची किंमत सुमारे 45 लाख रुपयांपेक्षा अधिक असून त्याची राहणी एखाद्या राजाप्रमाणे आहे. गोशाळेत राघवची खास काळजी घेतली जाते.
तसेच या गोशाळेत 'लाडली' नावाचं एक वासरूही आहे. ती चार महिन्यांची असताना त्याला 11 लाख रुपये किंमतीने मागणी आली होती.
विशेष म्हणजे या गोशाळेतून वासरू तसेच कोणतेही अन्य प्राणी विकले जात नाही. मात्र, इथे चांगल्या जातीच्या गायीला जन्म दिला जातो.