Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

हरदोई : लग्नघरात सिलिंडरचा स्फोट , लग्नघरात पसरली शोककळा

Uttar pradesh news
, रविवार, 21 मे 2023 (13:36 IST)
हरदोई : उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्यातील कोतवाली भागात एक वेदनादायक दुर्घटना घडली. लग्न समारंभाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबात गॅस सिलिंडरला आग लागल्याने नणंद आणि भावजय चा  मृत्यू झाला. त्याचवेळी चार जण भाजले, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. 
 
रविवारी मुलीचा विवाह सोहळा आहे. घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. शनिवारी रात्री उशिरा स्वयंपाक करण्यासाठी मुलीची आई आणि काकू तेथे होत्या. काकूंचा पाय लागून सिलिंडर पडला आणि त्यातील पिन बाहेर निघून गॅस गळती होऊ लागली. 

त्यांची वहिनी सरला (50) याही उपस्थित होत्या. तितक्यात मंजू चहा करायला लागली सिलेंडर पेटवायला माचिसची काडी पेटवली होती, त्यामुळे आग लागली. आगीच्या लोळात मंजू जळू लागली. मंजूला जळताना पाहून  सरला तिला वाचवण्यासाठी धावली, मग तीही आगीच्या भक्ष्यस्थानी जळू लागली.त्यांना वाचविण्यासाठी गेलेले चार जण  भाजले.त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातानंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.  
 
दोघांना जळताना पाहून लग्नघरात एकच गोंधळ झाला. आग इतकी भीषण होती की काही वेळातच दोघींचाही होरपळून मृत्यू झाला. आग विझवताना आणि वाचवताना बिट्टा देवी, रेणू, रामू आणि एक अनोळखी व्यक्ती जळून खाक झाली. अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
 
Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एटा: बसने दुचाकीला 12 किमीपर्यंत फरफटत नेले