ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सुरू असणारे उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेत असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुख्यमंत्री आणि अण्णांमध्ये दुपारी 2 वा. पासून रात्री 7 वा. पर्यंत सहा तास येथील यादवबाबा मंदिरात मॅरेथॉन बैठक सुरू होती.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनावर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आहे. शेवटी तोडगा निघाल्यानंतर अण्णांनी मुख्यमंत्री आणि गावातील ज्येष्ठ महिला यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन सात दिवसांपासूनचे उपोषण सोडले.