rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारूच्या नशेत गळ्यात अजगर घेऊन पेट्रोल पंपावर जाऊन पोहोचला

Coonoor of Kerala
, सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (11:46 IST)
साप असा प्राणी आहे ज्याचे नाव जरी समोर आले तर अंगाचा थरकाप उडतो. समोर आल्यावर घबराहट होते. एका व्यक्तीने चक्क दारूच्या नशेत आपल्या गळ्यात भला मोठा अजगर घेतल्याचा प्रकार केरळच्या कुन्नूर मध्ये घडला आहे. 
 
हातात भलामोठा अजगर घेऊन मद्यधुंद अवस्थेत हा व्यक्ती पेट्रोलपंपावर जाऊन पोहोचला आणि पेट्रोल पंपावरील लोकांना त्याने त्याचा फोटो काढण्यास सांगितले. 

पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्यांने सांगितले की हा व्यक्ती एवढ्या मद्यपान केलेला होता की तो काय करत आहे हेच त्याला माहित नव्हते. काहीच वेळाने अजगराने त्याच्या गळ्याला विळखा घातला.त्यांनतर तो व्यक्ती जमिनीवर पडला हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांना घाम फुटला. कर्मचारी म्हणाला काय करावं हा विचार करत असून त्याने एक पोत आणले आणि सापाची शेपटी धरली. आणि त्याला ओढू लागला. त्या अजगराने त्याला सोडले आणि निघून गेला. कर्मचाऱ्याने सांगितले की या कार्यात धोका होता पण त्या माणसाचा जीव वाचवणं देखील महत्त्वाचे होते. 
 
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Earthquake: गेल्या 12 तासांत 3 देशांत भूकंपाचे धक्के जाणवले