Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प
जम्मू-काश्मीरमध्ये चार दिवसांपासून केरन, माछल, करनाह, गुरेज, शोपिया, सोनमर्ग, अमरनाथ या भागांत सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे.

पहलगाममध्ये सर्वाधिक 5 सेंटीमीटर बर्फवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जवाहर टनलजवळ बर्फ जमा झाल्याने श्रीनगर नॅशनल हायवे बंद करण्यात आला आहे.

लेहमध्ये -9.5 डिग्री टेम्परेचर तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने 28 दिवसांचे रेशन आणि इंधन याचा स्टॉक केला आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशात शिमलासह सहा जिल्ह्यांत हिमवादळ आले. त्यामुळे रोहतांग आणि सोलंग नालामध्ये सुमारे सव्वा फूट आणि मनालीत एक फुटापर्यंत बर्फवृष्टी झाली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसबीआय लवकरच डिजी बँक सुरु करणार