कोरोना संसर्ग महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतो, परंतु हा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी महिलांमध्ये अधिक जागरूकता असल्याचे दिसून येत आहे. कारण कोरोना लसीकरणात महिलाच आघाडीवर आहेत.
आतापर्यंत देशात ५ लाखांहूनही अधिक लोकांवर लस देण्यात आल्या असून त्यापैकी ६३ टक्के महिला आरोग्य कर्मचारी किंवा संबंधित क्षेत्रातील कामगार आहेत. तसेच पुरुषांपेक्षा जवळजवळ दुप्पट स्त्रियांनी लस दिली आहे. लसीकरणात भारत हा जगातील तिसरा असा देश बनला आहे. तसेच २१ दिवसात ५० लाख लोकांना लस देण्याचा विक्रमही साध्य झाला आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त माहितीनुसार, रविवारपर्यंत देशात एकूण ५५,६२,६२१ लोकांना प्रथम डोस मिळाला आहे. यामध्ये ३५,४४,४५८ म्हणजे ६३.२ टक्के महिलांचा समावेश आहे, तर २०६१७०६ म्हणजेच ३६.८ टक्के पुरुष कर्मचारी आहेत.