उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं कोरोनाच्या नियमांची आणि निर्बंधांची पायमल्ली केल्याचं पाहायला मिळालं. प्रत्यक्ष केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या प्रचारात नियम पायदळी तुडवले गेल्याचं पाहायला मिळालं.
अमित शाह यांनी शुक्रवारी पश्चिम युपीमधील कैराना मतदार संघात प्रचार केला. अमित शाह यांनी याठिकाणी घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेत प्रचार केला. मात्र यावेळी कोरोनाच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं.
अमित शाह यांनी स्वतः मास्क लावलेला नव्हता. तसंच सोशल डिस्टन्सिंगबाबत निवडणूक आयोगाच्या नियमांचीही ऐशी-तैशी झाल्याचं पाहायला मिळालं.
निवडणूक आयोगानं केवळ पाच जणांसह घरोघरी जाऊन प्रचाराची परवानगी दिली आहे. पण शाह यांच्याबरोबर प्रचंड गर्दी आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात असल्याचं पाहायला मिळालं.