हरियाणातील कर्नालमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. हरियाणातील कर्नालमध्ये एका राईस मिलचा तिसरा मजला कोसळला आहे. तीन मजली राईस मिल कोसळल्याने चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. राईस मिलची इमारत कोसळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. गिरणीच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार दबले असण्याची शक्यता आहे. अनेक भात गिरणी कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचावकार्य सुरू आहे. इमारतीचा ढिगारा जेसीबीद्वारे हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तरवडी येथील शिवशक्ती राईस मिलची तिसऱ्या मजल्याची इमारत पहाटे साडेतीन वाजता अचानक कोसळली. इमारत कोसळल्याने 20 हून अधिक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले तर दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
तरवडी येथील शिवशक्ती राईस मिलच्या तीन मजली इमारतीत सुमारे 157 मजूर राहत होते. यातील काही जण रात्री कामावर गेले होते. तर 20 ते 25 मजूर रात्री इमारतीत झोपले होते. आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास झोपलेल्या मजुरांवर तीन मजली इमारत कोसळली. इमारत कोसळल्याने वीस मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले तर चार मजुरांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना पोलीस आणि बचाव पथक बाहेर काढत आहे.इमारत कोसळण्यामागची कारणे सध्या तरी उघड झालेली नाहीत.