Uttarakhand News : उत्तराखंडमधील चक्रता येथे बुधवारी भीषण अपघात झाला असून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक उत्तराखंडमध्ये आले होते, पण अपघाताने त्यांच्या सर्व आनंदाचे दु:खात रूपांतर झाले.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील चक्रता येथे बुधवारी भीषण अपघात झाला. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक उत्तराखंडमध्ये आले होते. बुधवारी चक्रता येथे एक कार नियंत्रणाबाहेर जाऊन खोल दरीत पडली.
या अपघातात चार महिन्यांच्या चिमुकल्यासह आठ जण जखमी झाले आहे. एसडीआरएफच्या पथकाने मोठ्या प्रयत्नाने त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले आहे.
Edited By- Dhanashri Naik