पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन करणार आहेत. संसदेच्या नवीन इमारतीविषयी संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे. संसदेची जुनी इमारत व नवीन इमारत यांच्यात नेमका कसा फरक आहे. नवीन संसद भवन कोणी बांधले? डिझाइन करणारा आर्किटेक्ट कोण आहे? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली. ती दिसायला सुंदर तर आहेच, पण सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप मजबूत आहे. खासदारांच्या आसन व्यवस्थेबरोबरच येथील ग्रंथालय, विश्रामगृह आणि चेंबर्सही आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहेत. नव्या संसदेत आणखी काय विशेष असणार आहे, हे मुद्यांत समजून घेऊ.
संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी 10 डिसेंबर 2020रोजी झाली. नवीन संसद भवन ही त्रिकोणी आकाराची चार मजली इमारत आहे. संपूर्ण कॅम्पस 64,500चौरस मीटर आहे. येथे ज्ञानद्वार, शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे तीन मुख्य दरवाजे आहेत. नवीन संसद भवन टाटा समूहातील टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने बांधले आहे. सध्या टाटा प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष डॉ. प्रवीर सिन्हा आणि एमडी विनायक पै आहेत.
गुजरातमधील आर्किटेक्चर फर्म एचसीपी डिझाईन्सने नवीन संसदेचे डिझाइन तयार केले आहे. या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद बिमल पटेल आहेत. या संसद भवनाची निर्मिती टाटा प्रोजक्टने 862 करोड रुपयांमध्ये केली आहे. या संसदेत 888 सदस्य बसू शकतात. तसेच राज्यसभेत 384 सदस्य बसू शकतात. नवे संसद भवन रेकॉर्ड वेळेत बनवले आहे.
नवीन संसद भवन वैशिष्ट्ये
नवीन इमारत त्रिकोणाकृती असेल.
टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड द्वारे इमारत बांधणी केली जाणार आहे. एचसीपी डिझाईन आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा.लि. ने त्याचे डिझाइन तयार केले आहे.
चार मजली इमारत असणार आहे.
लोकसभेत खासदारासाठी सुमारे 888 आणि राज्यसभा खासदारासाठी सुमारे 326 पेक्षा जास्त सीट्स असणार आहेत. पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1 हजार 224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील अशी क्षमता असेल. भविष्यात दोन्ही सभागृहांची वाढीव संख्या लक्षात ठेवून असे करण्यात आले आहे.
क्षेत्रफळ 64 हजार 500 चौरस मीटर असणार आहे. 16 हजार 921 चौ.मी. अंडरगाऊंड असेल.
971 कोटी खर्च बांधकामावर होण्याचा अंदाज आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग ही संसदेची नवीन इमारत बांधण्यासाठीची नोडल एजन्सी असेल.
भारताचा लोकशाही वारसा प्रदर्शित करण्यासाठी संविधान सभागृह, संसद सदस्यासाठी लाऊंज सभागृह, ग्रंथालय, अनेक समित्यांच्या खोल्या, भोजनगृहे या इमारतीत राहणार असून वाहने उभे करण्यासाठी पुरेशी जागाही ठेवण्यात येणार आहे.
हे नवीन भवन आत्मनिर्भर भारताचे उदाहरण असेल ते पूर्णपणे भारतीय नागरिक तयार करतील.
Edited By- Ratnadeep Ranshoor