Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

गुगल सर्चमध्ये 'शाई कशी काढावी' ची आघाडी

how to remove ink is most searchable in google
देशात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यामधील होत असतांना मतदान केल्यानंतर लावण्यात आलेली शाई कशी काढावी याबद्दल भारतातील तरूण लोक गुगलवर अधिक सर्च करत असल्याचे गुगल ट्रेण्डमध्ये दिसून आले आहे. सकाळी १० ते १२ या दोन तासांमध्ये मोठ्याप्रमाणात यासंदर्भातील गुगल सर्च झाले असले तरी दुपारनंतर अचानक हे प्रमाण वाढल्याचे या आलेखामध्ये दिसत आहे.
 
गुगल ट्रेण्डने दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल पासूनच लोक ‘How to remove vote ink’ नावाने गुगलवर सर्च करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, ‘How to remove vote ink’ या टर्मच्या सर्चचे प्रमाण वाढले देखील आहे. त्यामुळे, आजसुद्धा सुरु झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर बोटावर लावलेली शाई कशी काढावी यासंदर्भात सर्वाधिक सर्च करण्यात येत आहे. तर दुपारनंतर हा आकडा अधिकच वाढला असल्याची माहितीसुद्धा गुगल ट्रेण्डकडून देण्यात आली आहे. हे सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये दक्षिणेतील राज्ये आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये शाई काढण्यासंदर्भात गुगल सर्च करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्युलियन असांजे याला ब्रिटिश पोलिसांकडून अटक